श्री समर्थ रामदास स्वामीश्री समर्थ रामदास स्वामीश्री समर्थ रामदास स्वामीश्री समर्थ रामदास स्वामी
गुरुशिष्य संवाद — श्री समर्थ रामदास स्वामीगुरुशिष्य संवाद — श्री समर्थ रामदास स्वामीगुरुशिष्य संवाद — श्री समर्थ रामदास स्वामीगुरुशिष्य संवाद — श्री समर्थ रामदास स्वामीगुरुशिष्य संवाद — श्री समर्थ रामदास स्वामी

श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचालित

खाली पहा
श्रीग्रंथराज दासबोध

समर्थ कृपेची वचने

जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे ।
उत्तम गुण देखतां निवाले । जगदांतर ॥

॥ १२ · २ · १८ ॥

माणसांमधील उत्तम गुण जोपर्यंत लोकांमध्ये प्रगट होत नाहीत, तोपर्यंत त्या माणसाच्या योग्यतेची कल्पना येत नाही. पण एकदा गुण प्रगट झाले की जनताजनार्दन त्याची नक्की कदर करतात.

अवगुण सोडिता जाती । उत्तम गुण अभ्यासिता येती ।
कुविद्या सांडून सिकती । शहाणे विद्या ॥

॥ १४ · ६ · ५ ॥

अवगुण सोडायचे म्हटले तर ते जाऊ शकतात. उत्तम गुण प्रयत्नपूर्वक अंगी बाणता येतात. शहाणी माणसे कुविद्या सोडून देतात आणि उत्तम विद्या शिकतात.

श्री
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड

समर्थ सेवेचा वारसा

साधनेसाठी येऊन राहिलेले दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा, अण्णाबुवा असे अनेक रामदासी एकत्र येऊन १९३९ सालीनानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर “समर्थ संघाची” शाखा निर्माण झाली.

इ.स. १९४७–४८ च्या दरम्यान उद्योगपती समर्थभक्त बाबुराव वैद्य, सातारा हे गडावर आले व समर्थपूजेतील जीर्ण उपकरणे पाहून जीर्णोद्धाराचा संकल्प केला.

मंडळाची घटना तयार करून दिनांक ९ जानेवारी १९५०रोजी प.पू. श्रीधरस्वामींचा आशीर्वाद घेऊन श्री समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी “श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड” ही संस्था स्थापन करून कायद्यानुसार रजिस्टर्ड केली.

सज्जनगड · श्री समर्थ समाधी मंदिर
१९५०स्थापना ९ जानेवारी

इतिहास

१९३९

समर्थ संघ शाखा

नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर रामदासींची शाखा स्थापन.

१९४७

जीर्णोद्धार संकल्प

बाबुराव वैद्य यांनी समर्थपूजेच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला.

१९५०

मंडळाची स्थापना

श्रीधरस्वामींच्या आशीर्वादाने श्री समर्थ सेवा मंडळ रजिस्टर्ड.

आज

पत्रद्वारा दासबोध

घरा-घरातून समर्थ विचार पोचवणारा अध्ययन उपक्रम सुरू.

दासबोध अध्ययनाविषयी

अध्ययन उपक्रम

पत्रद्वारा दासबोध अभ्यास

घरबसल्या, पत्राच्या माध्यमातून श्रीग्रंथराज दासबोधाचे क्रमवार, मार्गदर्शनासह अध्ययन.

दासबोध प्रवीण

दासबोधाच्या सखोल अभ्यासाची परीक्षा — "दासबोध प्रवीण" प्रवेशपत्रिका भरण्यासाठी अर्ज करा.

समर्थ विचारधारा

आदर्श लोकनेता, परमेश्वरावरील श्रद्धा व पुरुषार्थ — समर्थांच्या विचारांचे समाजात रुजवण.

युवकांचे स्फूर्तिनिर्झर

युवकांसाठी समर्थ विचारांचे स्फूर्तिदायी संकलन — ई-बुक स्वरूपात उपलब्ध.

अभ्यासार्थी पोर्टल

अभ्यासार्थी व समीक्षकांसाठी ऑनलाइन पोर्टल — स्वाध्याय सादर करा व मूल्यमापन मिळवा.

स्वाध्याय साहाय्य

स्वाध्याय अभ्यासताना उपयुक्त संदर्भ, मार्गदर्शन व साधनसामग्री एका ठिकाणी.

0+
वर्षांचा सज्जनगड वारसा
0
मंडळ स्थापना वर्ष
0+
दशकांची समर्थ सेवा
0+
अभ्यासार्थी देशभर
अभ्यासार्थींचे अनुभव

साधकांचे मनोगत

"पत्रद्वारा दासबोध अभ्यासाने रोजच्या जीवनात समर्थांचे विचार उतरले. घरबसल्या साधना करता आली — हीच खरी समर्थकृपा."

सु
सुनील देशपांडेअभ्यासार्थी · पुणे